नोकरीसाठी पैसे दिलेल्यांनी पुराव्यांसह तक्रार करा; सर्वांना न्याय मिळेल : मुख्यमंत्री डॉ.

पैसे घेऊन नोकरी देण्याचे प्रकरण : पीडितांनी साखळीत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
नोकरीसाठी पैसे दिलेल्यांनी पुराव्यांसह तक्रार करा; सर्वांना न्याय मिळेल : मुख्यमंत्री डॉ.

डिचोली: पैसे घेऊन नोकरी देण्याच्या प्रकरणात फसवणूक झालेल्या काही पीडितांनी आज साखळी येथील रवींद्र भवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.

ज्यांनी कोणी नोकरीसाठी पैसे दिले आहेत, त्यांनी पूजा नाईकविरुद्ध तुमच्याकडे असलेले सर्व पुरावे घेऊन संबंधित पोलीस स्थानकात त्वरित तक्रार नोंदवावी. या प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास होईल आणि सर्वांना न्याय मिळेल असे आश्वासन फसवणूक झालेल्या लोकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले



मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले की, सध्या या प्रकरणाची चौकशी क्राइम ब्रँच करत असून, लवकरच या तपासाचा छडा लागण्याची शक्यता आहे. यानंतर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, असे आश्वासनही डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी पीडितांना दिले.

पीडितांनी मांडली व्यथा

 फसवणूक झालेल्या पीडितांनी पत्रकारांशी बोलताना आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही कष्ट करून कमावलेले पैसे मोठ्या आशेने पूजा नाईक यांना दिले होते. परंतु त्यांनी आमचा विश्वासघात केला. आजतागायत आम्हाला एक रुपयाही परत मिळालेला नाही. शेवटी दुसरा पर्याय नसल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा