'इंडियन पॅनोरमा'चे रेड कार्पेट, मास्टरक्लास आणि 'क्रिएटिव्ह माइंड्स'चे उद्घाटन.

पणजी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ ची जोरदार सुरूवात आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी विविध स्क्रीनिंग, मास्टरक्लास, पॅनल चर्चा आणि रेड कार्पेट कार्यक्रमांसह झाली. गोव्यातील अनेक ठिकाणी आजचा दिवस सर्जनशीलता आणि सखोल विचारांचा अनोखा संगम साधणारा ठरला.

सकाळचे महत्त्वाचे कार्यक्रम
दिवसाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता कला अकादमी येथे 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' (CMOT) च्या उद्घाटनाने झाली. भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना यात प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता मास्टरक्लास मालिकेचे उद्घाटन झाले, ज्यामुळे दिवसाच्या समृद्ध सत्रांसाठी व्यासपीठ तयार झाले. सकाळी ११:३० वाजता आयनॉक्स १, पणजी येथे 'इंडियन पॅनोरमा रेड कार्पेट आणि स्क्रीनिंग'च्या उद्घाटनाने पार पडला.

येथे सर्वोत्तम भारतीय चित्रपटांचे दर्शन घडवले जात आहे. दरम्यान याच वेळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार कमला हासन आणि साई पल्लवी यांचे आगमन झाले. आज सायंकाळ पर्यंत रेड कार्पेट, प्रीमियर्स, मास्टरक्लास आणि विविध चर्चासत्रांना देशांतील तसेच जागतिक पटलावरील सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती लाभेल.

सिनेमा आणि संस्कृतीवर चर्चासत्र
सकाळच्या सत्रात ११:३० ते १:०० या वेळेत कला अकादमीमध्ये "सिनेमा आणि संस्कृती: दोन युगातील प्रतिबिंब" या मास्टरक्लासमधून कथा सांगण्याच्या शैली आणि पिढ्यानपिढ्या होणारे बदल यावर सखोल चर्चा झाली. दुपारच्या सत्रात २:३० ते ४:३० या वेळेत कला अकादमीमध्ये "द ल्युमिनरी आयकॉन्स: क्रिएटिव्ह बॉन्ड्स अँड फियर्स परफॉरमन्सेस" या मास्टरक्लासमध्ये कलात्मक सहकार्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या प्रदर्शनावर प्रकाश टाकला जाईल.

चित्रपटांचे प्रदर्शन आणि पर्यावरणाचा विचार
चित्रपट प्रदर्शनाचे सत्र पुन्हा ४:३० वाजता सुरू होईल, ज्यात पीआयबी मीडिया सेंटर येथे उद्घाटनपर नॉन-फीचर चित्रपट 'काकोरी' चे स्क्रीनिंग असेल. त्याचवेळी, कला अकादमीमध्ये ४:३० ते ६:०० या वेळेत "रील ग्रीन: सस्टेनेबिलिटी अँड स्टोरीटेलिंग अक्रॉस फोर सिनेमाज" या पॅनल चर्चेत चित्रपटाच्या भविष्यावर मंथन होईल. या चर्चेत पर्यावरणपूरक चित्रपट निर्मितीसाठी चित्रपट उद्योगाची वाढती बांधिलकी अधोरेखित केली जाणार आहे.
/mayapuri/media/post_attachments/assets/images/2025/11/07/bharataya-atararashhataraya-falma-mahatasava-2025_f1a9084647aa50644f45c5b366f22c52-901380.jpeg?w=414&dpr=1.0&q=80)
दिवसाचा समारोप संध्याकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात 'IFFIESTA' या सांस्कृतिक सोहळ्याने होईल. यात चित्रपट, कला आणि संगीत यांचा सुंदर संगम चित्रपट रसिकांना पाहायला मिळेल.

.