वास्कोतून 'अपहरण' झालेला अल्पवयीन मुलगा ४८ तासांत सापडला

कुटुंबीयांना दिलासा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
वास्कोतून 'अपहरण' झालेला अल्पवयीन मुलगा ४८ तासांत सापडला

वास्को: वास्को येथील म्युनिसिपल हायस्कूलजवळून एका मुलाचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून वास्को पोलिसांनी तपास सुरू केला होता. आता अवघ्या ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. मुलाच्या मावशीने याबबात तक्रार दाखल केली होती.

पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ एक विशेष पथक तयार केले. या पथकाने वास्को आणि गोव्याच्या इतर भागांत कसून शोधमोहीम राबवली. त्याचवेळी तांत्रिक देखरेख पथकाने काम करून ४८ तासांच्या आत अल्पवयीन मुलाचा ठावठिकाणा शोधला. हा मुलगा रत्नागिरी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले असून, त्याला लवकरच त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाईल.

हेही वाचा