थिवी मधील ॲक्वाडेकमधून गळती; तिलारीचे लाखो लीटर पाणी वाया!

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
थिवी मधील ॲक्वाडेकमधून गळती; तिलारीचे लाखो लीटर पाणी वाया!

थिवी: फोटीर, थिवी(Thivim) (किल्ल्याजवळ)येथे तिलारी (Tilari)जलसिंचन प्रकल्पाच्या ॲक्वाडेकमधून सुरू असलेलीसततची गळती गेल्या एक वर्षांहूनअधिक काळापासून पूर्ण वेगानेसुरू आहे. तिलारीकालव्याचे पाणी मोठ्या प्रमाणातथेट जवळच्या नाल्यात जाऊनवाया जात आहे.


दीर्घकाळापासूनसुरू असलेल्या या गळतीवर गोवा(Goa) तिलारी जलसिंचनविकास महामंडळ आणि जलस्त्रोतखात्याकडून अद्याप कोणतीहीदुरुस्ती किंवा सुधारात्मकउपाय व्यवस्था करण्यात आलेलीनाही. बार्देशतालुक्यातील अनेक भागांतपाण्याचा तुटवडा जाणवत असताना,पाण्याचा हा अपव्यय अत्यंतचिंताजनक आहे, असेस्थानिकांचे म्हणणेआहे.


स्थानिकांच्यादाव्यानुसार, यासंदर्भात अनेक वेळा तक्रारीकेल्या गेल्या, तरीही कोणत्याही अधिकाऱ्यांनीकिंवा जलस्रोत खात्यानेही गळती थांबवण्यासाठी कोणतीहीपावले उचललेली नाहीत. पाणीबचतीचे आवाहन एका बाजूला आणितिलारीचे पाणी वर्षभर एवढ्यामोठ्या प्रमाणात वाया जाणे,ही परिस्थिती प्रशासनातीलगंभीर दुर्लक्ष दर्शवते.


तिलारीच्यापाण्यावर अवलंबून असलेल्याशेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,या सततच्या अपव्ययामुळेयेणाऱ्या काळात पाण्याचीटंचाई आणखी तीव्र होऊ शकते.त्यामुळे ॲक्वाडेकचीतात्काळ दुरुस्ती करून मौल्यवानपाण्याचे होणारे नुकसानताबडतोब थांबवण्याची मागणीत्यांनी केली आहे.

हेही वाचा