यूपी वॉरियर्सने मोजले दीप्ती शर्मासाठी ३.३० कोटी

डब्ल्यूपीएल मेगा ऑक्शन : अमेलियासाठी मुंबईने मोजले ३ कोटी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27th November, 11:37 pm
यूपी वॉरियर्सने मोजले दीप्ती शर्मासाठी ३.३० कोटी

नवी दिल्ली : वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ चे मेगा ऑक्शन नवी दिल्लीतील एरोसिटी हॉटेलमध्ये पार पडले. या ऑक्शनमध्ये ५ संघांनी मिळून एकूण १७ खेळाडूंना रिटेन केले होते आणि त्यामुळे ७३ खेळाडूंना लॉटमध्ये ठेवण्यात आले होते. ऑक्शनपूर्वी संघांकडे एकूण ४१.१० कोटींचे बजेट होते. सर्वप्रकारे लिलाव पूर्ण झाल्यानंतर ६७ खेळाडू खरेदीस गेले आणि एकूण ४०.८ कोटी खर्च करण्यात आले. दीप्ती शर्मा सर्वात महागडी खेळाडू ठरली.
भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्स संघाने राईट टू मॅच कार्डचा वापर करून ३.२० कोटींना आपल्या फ्रँचायझीत घेतले. या ऑक्शनमध्ये दुसऱ्या क्रमांकावरची महागडी खरेदी होती अमेलिया केर, जिला मुंबई इंडियन्सने ३ कोटीला खरेदी केले.
डब्ल्यूपीएलमध्ये दर ३ वर्षांनी मेगा ऑक्शन घेतला जातो ज्या माध्यमातून संघांना पुन्हा एकदा आपला संघ पुन्हा उभारण्याची संधी मिळते. मागील मेगा ऑक्शन २०२२ मध्ये पार पडले होता. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्ये मिनी ऑक्शन्स झाले ज्यात संघांना अनेक खेळाडू रिटेन करण्याची लवचीकता असते. परंतु मेगा ऑक्शनमध्ये संघ फक्त जास्तीत जास्त ५ खेळाडूंना रिटेन करू शकतात.
खेळाडूंना विविध सेटमध्ये विभागण्यात आले होते. सुरुवात करण्यात आली मार्की सेट पासून, ज्यात सर्वाधिक मागणीतले ८ खेळाडू होते. त्यानंतर अनुक्रमे आंतरराष्ट्रीय फलंदाज, अष्टपैलू, विकेटकीपर्स, पेसर्स आणि स्पिनर्स असे टप्पे पार करण्यात आले. सर्व आंतरराष्ट्रीय सेट पूर्ण झाल्यावर अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव झाला.
एकूण ४०.८ कोटींच्या व्यवहारात ६७ खेळाडू फ्रँचायझींनी खरेदी केले. या ऑक्शनमुळे संघांना पुढील काळात आपली संघरचना मजबूत करण्याची संधी मिळणार आहे; तसेच युवांनाच अधिक संधी देण्याची बाजूही समोर येणार आहे.
एकूण १७ खेळाडू रिटेन
या ऑक्शनमध्ये ५ संघांनी एकूण १७ खेळाडूंना रिटेन केले. ज्यात सात परदेशी आणि तीन अनकॅप्ड खेळाडू होते. भारताकडून रिटेन केलेल्या प्रमुख नावांत स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, अमनजोत कौर आणि श्रेयंका पाटील यांचा समावेश आहे. या बहुतेक खेळाडूंचे सामन्यांतील योगदान वर्ल्डकप विजेते संघाशी संबंधित आहे.