गोवा पोलिसांना दिले ३१ लॅपटॉप मोफत; महाराष्ट्र पोलिसांनी २.८० कोटींच्या फसवणूकप्रकरणी केली अटक


2 hours ago
गोवा पोलिसांना दिले ३१ लॅपटॉप मोफत; महाराष्ट्र पोलिसांनी २.८० कोटींच्या फसवणूकप्रकरणी केली  अटक

पणजी : गोवा पोलिसांना (Goa Police) ३१ लॅपटॉप मोफत देत समाजसेवा केलेल्या वैभव ठाकर याला महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police)  एका ज्वेलर्सला २.८० कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक केली. महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयातील (सीमओ) (CMO Maharashtra) उच्च अधिकारी असल्याची बतावणी करीत त्याने ही फसवणूक केली. 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गोवा पोलिसांना ३१ लॅपटॉप मोफत दिलेल्या या इसमाने आमदाराचा वैयक्तीक सहाय्यक म्हणून बनावट ओळखपत्र बनवले होते.

 महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) अधिकारी असल्याचे भासवून झवेरी बाजारातील एका ज्वेलर्सला २.८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ७ डिसेंबरला त्याला अटक करण्यात आली.  वैभव ठाकर याला यापूर्वी २०० कोटी रुपयांच्या सोन्याच्या व्यापार प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली होती. गेल्या वर्षी त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर ठाकर गोव्यात आला.  त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि गोवा पोलिसांना ३१ लॅपटॉप मोफत दिल्याची माहिती पुढे आली आहे.  

 ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या ठाकरला १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याच्या माहितीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.   ठाकरने ज्वेलर शैलेश जैनचा विश्वास जिंकण्यासाठी स्वतःला राज्याचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी केली.  त्याने कस्टम्स लिलावातून सोने मिळवण्यासाठी त्याच्या "अधिकृत प्रभावाचा" वापर करू शकतो असा दावा केला.  त्यानंतर जैनने २.८० कोटी रुपये हस्तांतरित केले. याप्रकरणी पोलिसांनी ठाकरसह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणात ठाकर हा मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ठाकरने महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळविण्यासाठी आमदाराच्या वैयक्तिक सहाय्यकाच्या नावाने बनावट ओळखपत्र देखील बनवले होते. ज्वेलर्सच्या तक्रारीनंतर एलटी मार्ग पोलिस रविवारी त्याला अटक केली. त्यापूर्वी अनेक आठवडे ठाकरचा शोध घेत होते. अशाच प्रकारे आणखी कुणाची फसवणूक केल्यास त्यांनी त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

हेही वाचा