गोवा नाईट क्लबला आग: लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीनासाठी दिल्ली न्यायालयात धाव


9 mins ago
गोवा नाईट क्लबला आग: लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीनासाठी दिल्ली न्यायालयात धाव

नवी दिल्ली : गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन रेस्टॉरंटचे (Birch by Romeo Lane restaurant in Goa) मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा (Gaurav Luthra and Saurabh Luthra) या दोघाही बंधूंनी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात (Delhi's Rohini Court) अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

आगीची दुर्घटना घडून त्यात २५ जणांचा बळी गेला. या भीषण दुर्घटनेनंतर लुथरा बंधू इंडिगोच्या विमानाने थायलंडच्या फुकेट येथे पळून गेले. त्यानंतर गोवा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केल्याची माहिती डीआयजी वर्षा शर्मा यांनी दिली. सीबीआय व इंटरपोलशी समन्वय साधला असल्याची माहिती त्यांनी दिली. 

अटकपूर्व जामीनाला गोवा पोलीस विरोध करणार : पोलीस महासंचालक   

 गौरव व सौरभ लुथरा यांच्या अटकपूर्व जामीनाला गोवा पोलीस दिल्लीच्या न्यायालयात विरोध करणार असल्याची माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली. यासंदर्भात अजून नोटीस आली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

अजय गुप्ता याची चौकशी 

याप्रकरणी काल अटक केलेल्या अजय गुप्ता याला आज सनलाईट कॉलनी येथील क्राइम ब्रांचच्या  कार्यालयात आणून चौकशी सुरू केली आहे. 

दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने गोव्यातील वागातोर येथील रोमियो लेन रेस्टॉरंटचा काही भाग काल पाडला. हे रेस्टॉरंट गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा या दोन भावांच्या मालकीचे आहे.

हेही वाचा