सावकारी जाचातून शेतकऱ्याने कंबोडियात जाऊन विकली किडनी

आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड, डॉक्टरसह सावकार गोत्यात.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
सावकारी जाचातून शेतकऱ्याने कंबोडियात जाऊन विकली किडनी

चंद्रपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra) चंद्रपूर (Chandrapur) येथे सध्या एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मूत्रपिंड (Kideny) विक्रीचे रॅकेट  व कर्ज देऊन लोकांची पिळवणूक करणारे सावकार याचा जाच अनेकांना बसल्याचे पुढे आले आहे.  गायींचा धंदा सावरण्यासाठी एकाने सावकारांकडून १ लाख कर्ज काढले. कर्ज भरता न आल्याने सावकाराने मूत्रपिंड विकण्यास सांगितले. मूत्रपिंड विक्रीच्या रॅकेटमध्ये असलेल्या डॉक्टरच्या संपर्कात आला व कंबोडियात (Cambodia) जाऊन ८ लाख रुपयांना मूत्रपिंड विकले. याप्रकरणी पोलिसांनी मूत्रपिंड विक्रीतील मुख्य एजंट डॉ. कृष्णा याला अटक केली आहे. याप्रकरणाचे धागेदोरे कंबोडियापर्यंत पोचले आहेत. लोकांना कर्जाच्या जाळ्यात ओढून पिळवणूक करणारे चंद्रपूर परिसरातील सहा सावकार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड ताालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांनी आपल्या आजारी गायींवर उपचार करण्यासाठी प्रथम ५० हजार रुपये व नंतर ते कर्ज भरण्यासाठी आणखी ५० हजार रुपयांचे सावकारांकडून कर्ज काढले. कर्ज न भरल्याने सावकाराचा जाच वाढला व त्याने मूत्रपिंड विकण्यास सांगितले. 

त्याचवेळी आर्थ‌िक डबघाईत येऊन मूत्रपिंड विक्रीचे रॅकेट चालवत असलेला कपड्यांचा व्यापारी त्याला सापडला. डॉक्टर कृष्णा या नावाने हे रॅकेट चालवत असलेल्या मूळ मल्लेश याने रोशन कुळे याला कंबोडियात नेले व त्याठिकाणी ८ लाख रुपयात त्याचे मूत्रपिंड काढून त्याची विक्री केली. हरियाणा येथून ऑपरेट होत असलेल्या ‘किडनी डोनर कम्युनिटी’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून रोशन कुळे या डॉक्टरच्या संपर्कात आला. सोलापूर येथे वास्तव्यासा असलेला कृष्णा हा आपण चेन्नई येथील रहिवासी व डॉक्टर असल्याचे सांगत होता.  त्याने अशाच प्रकारे १० ते १२ जणांना कंबोडियात नेऊन त्यांचे मूत्रपिंड काढून विक्री केल्याचे पुढे आले आहे. कथित डॉ. कृष्णा याच्या जाळ्यात अडकून अनेकांनी मूत्रपिंड विकल्याची शक्यता वर्तवली जात असून, देशातील इतर राज्यांतही त्याचे नेटवर्क असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी लोकांना कर्ज देऊन पिळवणूक करणारे सहा सावकारही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना अटक करून पोलिसांनी तपास चालवला आहे.  






हेही वाचा