पुढील महिन्यात सहा खाण पट्ट्यांचा लिलाव : मुख्यमंत्री

‘डंप’चा दुसरा टप्पाही लवकरच

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
पुढील महिन्यात सहा खाण पट्ट्यांचा लिलाव : मुख्यमंत्री

पणजी : सरकारने आतापर्यंत १२ खाण पट्ट्यांचा लिलाव केला आहे. यातील ५ पट्टे सुरू झाले आहेत, तर ४ लवकरच सुरू होतीत. अन्य ६  पट्ट्यांसाठी पुढील महिन्यात लिलाव केला जाईल. सरकारी डंप पॉलिसी अंतर्गत लिलावाचा पहिला टप्पा झाला असून दुसरा टप्पा या महिन्यात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अर्थ खात्याच्या बैठकी बाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थ संकल्पातील तरतुदींसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी ५४ टक्के निधी नोव्हेंबर अखेरीस वापरण्यात आला आहे. मार्च २०२६ पर्यंत मंजूर निधी पैकी ९५ टक्के वापरण्यात येईल. या बैठकीत अर्थ संकल्पात मांडलेल्या विविध तरतुदींचा आढावा घेण्यात आला.

अर्थसंकल्प हमीचा पुन्हा एकदा आढावा

बैठकीत सर्व खात्याकडून देण्यात आलेले अर्थसंकल्प हमीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला. सर्व हमी पूर्ण करण्याच्या सूचना खाते प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यात ज्या वेगाने जीएसटी संकलन होणे अपेक्षित होते तितक्या गतीने झाले नाही, याचा काहीसा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा