‘दे दे प्यार दे २’ ते ‘फ्रीडम ॲट मिडनाईट सीझन २’ एकापेक्षा एक धमाकेदार मनोरंजन


08th January, 10:41 pm
‘दे दे प्यार दे २’ ते ‘फ्रीडम ॲट मिडनाईट सीझन २’ एकापेक्षा एक धमाकेदार मनोरंजन

या शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. ‘दे दे प्यार दे २’, लोकप्रिय मेडिकल ड्रामा ‘द पिट सीझन २’, तसेच ऐतिहासिक मालिका ‘फ्रीडम ॲट मिडनाईट सीझन २’ यांसारख्या दमदार कंटेंटमुळे हा वीकेंड मनोरंजनाने भरलेला असणार आहे.

 

दे दे प्यार दे २ । नेटफ्लिक्स
२०१९ मधील सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यावेळी कथा भारतात घडते, जिथे आशिष आपल्या प्रेयसी आयेशाच्या आधुनिक पंजाबी कुटुंबाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, आर माधवन, गौतमी कपूर आणि मीजान जाफरी यांचा दमदार अभिनय यात पाहायला मिळेल.

 
पिपल्स वूई मीट ऑन व्हेकेशन । नेटफ्लिक्स
एमिली हेन्री यांच्या कादंबरीवर आधारित हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. एमिली बॅडर आणि टॉम ब्लाइथ यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून, दोन स्वभावाने पूर्णपणे वेगळे असलेले मित्र जेव्हा प्रेमसंबंधात अडकतात, तेव्हा त्यांचे आयुष्य कसे बदलते, याची ही गोड कथा आहे.

 
द पिट सीझन २ । जिओहॉटस्टार
पहिल्या सिझननंतर १० महिन्यांनी घडणाऱ्या घटनांवर आधारित हा सिझन आहे. पिट्सबर्ग ट्रॉमा मेडिकल सेंटरमधील डॉक्टर, विशेषतः डॉ. मायकेल “रॉबी” रॉबिनविच (नोह वायले) आणि त्यांची टीम, अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी वीकेंडदरम्यान येणाऱ्या प्रचंड ताणतणावाच्या परिस्थितीला कसे सामोरे जातात, हे यात दाखवले आहे.

 
फ्रीडम अॅट मिडनाईट सीझन २ । सोनीलिव्ह
पहिल्या सिझनमध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व राजकीय घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. दुसरा सिझन स्वातंत्र्यानंतरच्या अस्थिर आणि धक्कादायक काळावर प्रकाश टाकतो. डोमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या पुस्तकावर आधारित या मालिकेत सिद्धांत गुप्ता, राजेंद्र चावला आणि चिराग वोहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 
अल्फा मेल्स सीझन ४ । नेटफ्लिक्स
स्पॅनिश कॉमेडी सीरिजचा चौथा सिझन. चार मित्र आधुनिक जगातील बदलत्या नातेसंबंधांमध्ये स्वतःसाठी ‘बंधनमुक्त’ जागा शोधण्याचा प्रयत्न करतात, अशी या विनोदी मालिकेची कथा आहे.

 
तेहरान सीझन ३ । ॲपल टीव्ही
मोसाद एजंट तामर राबिन्यान (निव सुलतान) पुन्हा एकदा धोकादायक मिशनवर परतते. या सिझनमध्ये ह्यू लॉरी यांची एंट्री होत असून, ते एका दक्षिण आफ्रिकन न्यूक्लियर इन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत थरार, गुप्तहेरगिरी आणि राजकारण यांचे जबरदस्त मिश्रण पाहायला मिळणार आहे.


अ थाउझंड ब्लोझ सीझन २ | जिओहॉटस्टार
या सिझनमध्ये मॅरी कार (एरिन डोहर्टी) आणि तिची ‘फोर्टी एलिफंट’ ही महिला टोळी पुन्हा एकत्र येते. जुने शत्रू, नवी आघाडी आणि नव्या संकटांना तोंड देत ही टोळी कशी लढते, यावर कथा केंद्रित आहे.

 

मास्क । झी५

केविन आणि अँड्रिया जेरेमिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा तमिळ अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. एक भ्रष्ट प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एका रहस्यमय मुखवटा घातलेल्या टोळीच्या प्रकरणात अडकतो आणि त्यातून सुरू होतो थरारक प्रवास.

 
बाल्टी । ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ
मल्याळम आणि तमिळ भाषेतील हा स्पोर्ट्स अ‍ॅक्शन चित्रपट आहे. कबड्डी खेळाडूंच्या एका गटाची मैत्री, वैयक्तिक वाद आणि धोकादायक संघर्ष यांमुळे कशी कसोटीला लागते, याची ही प्रेरणादायी कथा आहे.

हेही वाचा