केरी, सत्तरीतील गोवन स्पाईज हॉटेलवरील एफडीएच्या छाप्यात आढळल्या अनेक त्रुटी

१५ दिवसांत सर्व सुरळीत करून अहवाल देण्याचा निर्देश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
केरी, सत्तरीतील गोवन स्पाईज हॉटेलवरील एफडीएच्या छाप्यात आढळल्या अनेक त्रुटी

पणजी : गोव्यातील (Goa) केरी, सत्तरीतील (Keri, Sattari) गोवन स्पाईज हॉटेलवर एफडीएने (FDA) मारलेल्या छाप्यात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. १५ दिवसांत सर्व गोष्टी सुरळीत करून अहवाल सादर करण्याचा निर्देश देण्यात आले आहेत.

एफडीएच्या पाहणीत खालील त्रुटी आढळल्याचे एफडीएने आपल्या अहवालात (Report) नमूद केले आहे.

स्वयंपाकघरात भाज्या चिरण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी चाकू गंजलेले होते. सर्व ड्रॉवर उघडे होते व त्यांची योग्य स्वच्छता राखलेली नव्हती. सोकपीट ओसंडून वाहत होते व ते आरोग्याला धोका निर्माण करणारे ठरू शकते. स्वयंपाकघरात अनावश्यक साहित्य आढळले तसेच आजूबाजूच्या परिसरातही ते अस्ताव्यस्त पसरलेले होते. पिण्याच्या पाण्याचा स्रोत स्पष्ट केला नव्हता. तसेच पाणी तपासणीचा अहवाल सादर करण्यात आला नव्हता. कच्चा माल योग्य लेबलशिवाय आढळून आला. स्वयंपाकघरात सिंथेटिक फूड कलर आढळला तसेच तो कालबाह्य असल्याचे दिसून आले. कच्चा माल ठेवताना पद्धत पाळली जात नव्हती. प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करण्यात आले नव्हते. साठवणूक क्षेत्रात अन्नपदार्थ आढळले. मात्र; दुकान बंद केल्यानंतर योग्य स्वच्छता करण्यात येत नसल्याचे निरीक्षणात आले. वरील सर्व त्रुटी १५ दिवसांच्या आत दूर करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल एफडीए कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित कालावधीत अनुपालन न केल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा एफडीएच्या अहवालातून देण्यात आला आहे. 

हेही वाचा