अबकारी खात्याकडून काजू भट्टी लावण्यासाठी होणार लवकरच लिलाव

दारूचा दर १५ लिटरला १ हजार निश्च‌ित

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
7 hours ago
अबकारी खात्याकडून काजू भट्टी लावण्यासाठी होणार लवकरच लिलाव

पणजीः वर्ष २०२५ च्या काजू हंगामासाठी गोव्यातील (Goa) वेगवेगळ्या क्षेत्रातील काजूच्या (Cashew) रसापासून दारू (Liqour)  उत्पादन करण्याच्या भट्टी लावण्यासाठी अबकारी खाते लिलाव घडवून आणणार आहे. जास्तीतजास्त दारू उत्पादनाही हमी देणाऱ्या बोलीदारांसाठी ही पावणी होती. १५ लीटरच्या जरा मागे १ हजार रुपये एवढा दारूचा दर निश्चित केला असल्याची माहिती गोवा अबकारी आयुक्त कार्यालयाने जारी केली आहे.  

गोवा अबकारी (Goa Excise)  शुल्क नियम १९६४ च्या नियम ७२ (२) खाली स्थापन केलेल्या समिती पुढे हा लिलाव धारबांदोडा तालुका सोडल्यास इतर अकराही तालुक्यांसाठी असणार आहे. या ११ तालुक्यांचे उत्तर गोवा (North Goa) आणि दक्षिण गोवा (South Goa) अशा दोन झोनांनी वर्गीकरण केले आहे. उत्तर गोवा काजू विभागात बार्देश आणि ‌डिचोली तालुक्यासाठी पुढील मह‌‌िन्याच्या ४ फेब्रुवारीला तर तिसवाडी, पेडणे आणि सत्तरी तालुक्यासाठी ५ फेब्रुवारी या दिवशी स्वामी विवेकानंद सभागृह, जुन्ता हाऊस, पणजी येथे सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. 

दक्षिण गोवा विभागात मुरगाव, काणकोण, फोंडा तालुक्यांसाठी २८ जानेवारी आणि सासष्टी, केपे, सांगे या तालुक्यांसाठी २९ जानेवारी रोजी मडगावातील रवींद्र भवनातील कृष्ण कक्षात सकाळी ११ वाजता लिलाव होणार आहे.

प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे १०० रुपये अनामत रक्कम जमा केल्याशिवाय कुठल्याही बोलीधारकाला लिलावात बोली लावण्यास मिळणार नाही. ही अनामत रक्कम १९ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत खात्यांत जमा करू शकतात. त्यानंतर संबंधीत तालुक्याचा लिलाव सुरू होण्यापूर्वी लिलावाच्या जागी देखील रक्कम स्वीकारली जाणार आहे. 

लिलाव संपल्यानंतर ज्या बोलीदारांनी लिलाव घेतला नाही; त्यांना जमा केलेली अनामत रक्कम त्यांनी भरलेल्या रकमेची मूळ पावती सादर केल्यावर त्यांना परत केली जाणार आहे. बोलीची पूर्ण रक्कम भरल्यानंतर २५ टक्के ‘अण्डर प्रूफ’ किंवा त्याच्यापेक्षा कमी तिव्रतेच्या दारूचे सर्वात जास्त उत्पादन करण्याची हमी देणा बोलीदारांना परवाना मंजूर केला जाणार आहे. यशस्वी बोलीदारांना कर शुल्क भरल्यानंतर ५ दिवसांच्या आत संबंधीत तालुक्याच्या अबकारी निरीक्षकांना भट्टया लावण्याचा आकडा आणि भट्टया लावण्याची जागा कळवणे सक्तीचे आहे. अबकारी खात्याने काजू हंगाामासाठी काजू रसाचे दर ६ रुपये प्रती लिटर आणि काजूगरांविना पिकलेल्या बोंडाचे दर ५ रुप्ये प्रती किलो नि‌श्चित केला आहे. तसेच काजूच्या दारूचा दर १ हजार रुपये (१५ लिटर) असा नि‌श्चित केला आहे. 

परवाना धारकाने काजूचा रस्त आणि डिस्टिलड दारू साठवण्यासाठी योग्य भांड्यांचा वापर करावा आणि डिस्टिलेनासाठी योग्य स्थिर यंत्रणा उभारावी. कुठल्याही टप्प्यावर कोळशाच्या, डांबराच्या बॅरलांचा वापर होऊ नये, अशी सूचना अबकारी खात्याने दिली आहे.  


हेही वाचा