झोपडीत राहणाऱ्या मजुराला ७ कोटींचा आयकर भरण्याची नोटीस; कुटुंब मानसिक दबावाखाली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
झोपडीत राहणाऱ्या मजुराला ७ कोटींचा आयकर भरण्याची नोटीस; कुटुंब मानसिक दबावाखाली

कानपूर : झोपडीवजा घरात वास्तव्य तर दोन वेळचे जेवण कसे मिळवावे या विवंचनेत दिवस काढणाऱ्या एका मजूर कुटुंबाला ७ कोटी रुपये आयकर भरण्याची नोटीस (Income Tax Notice) आली आहे. त्यामुळे कुटुंब दबावाखाली असून, आदीच दारद्रय त्यात ही नोटीस पाहून कुटुंब चक्रावले आहे. एवढी रक्कम आणणार कुठून ही विवंचना कुटुंबाला सतावत आहे. 

हरदोई, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे हा सर्वांना अचंबीत करून सोडणारा प्रकार घडला आहे. हरदोई जिल्ह्यात माधौजंग पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रुदामाऊ गावात वास्तव्यास असलेले गोविंद यांना आयकर विभागाकडून ७ कोटींचा कर भरण्याची नोटीस आली आहे. 

गोविंद व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. आयकर विभागाचे (Income Tax Department) पथक ७ कोटी १५ लाख ९२ हजार ७८६ रुपयांची नोटीस घेऊन त्यांच्या घरी पोहोचले त्यावेळी त्यांना धक्काच बसला. आणि आपली घोर फसवणूक झाल्याचे कळून चुकले. 

दोन वेळचे जेवण कसे मिळणार याची ‌चिंता असताना आयकर विभागाची ही नोटीस पाहून गोविंदच्या घरात चिंतेचे वातावरण आहे. भीतीमुळे घरात अनेक दिवस चूलही पेटलेली नाही. त्याची पत्नी सोनी देवी वृद्ध आईवडील अश्रू ढाळण्या पलीकडे दुसरे काही करीत नाहीत. 

अशी झाली फसवणूक

गोविंद याची कशी फसवणूक झाली व ७ कोटी रुपये भरण्याची आयकर नोटीस कशी आली; याचा उलगडाही आता झाला आहे. गोविंद कामाच्या शोधात ६ वर्षांपूर्वी कानपूरला गेला होता. त्याठिकाणी एका महिलेने त्याला सरकारी मदत ‌मिळवून देण्याचे आमिष दाखवले व सीतापूरमधील बिसवा येथे घेऊन गेली. तेथे एचडीएफसी बॅंकेत त्याचे खाते खोलण्यात आले व त्याबदल्यात त्याला २ ते ३ हजार रुपये देण्यात आले. त्याबदल्यात गोविंदने बॅंकेचे पासबूक व चेकबूक त्यांच्याकडे सोपवले. त्यानंतर तो सर्व काही विसरून गेला. मात्र, पासबूक घेतलेल्या टोळीने गोविंदच्या नावावर बनावट फर्म तयार केले व त्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केले. त्याचा फटका आता गोविंदला आता बसला असून,  ७ कोटी रुपये आयकर भरण्याची नोटीस आली आहे. 

परिस्थिती हलाकीची

गोविंद स्वत: मजुरी करतो तर त्याचा मोठा भाऊ हातगाडी चालवतो तर लहान भाऊही मजुरी करतो. एका गरीब कुटुंबाची ही विवंचना व झालेली फसवणूक सध्या दिसत आहे तर प्रशासनाने न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. 




हेही वाचा