फोंडकवाडो, पर्रा येथे घराला आग; ५ लाखांचे नुकसान

अग्न‌िशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
फोंडकवाडो, पर्रा येथे घराला आग; ५ लाखांचे नुकसान

म्हापसा : गोव्यातील (Goa) फोंडकवाडो, पर्रा येथे घराला आग (Fire) लागण्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या आगीत सुमारे ५ लाख रुपयांची हानी झाली. म्हापसा (Mapusa) अग्न‌िशामक दलाने (Fire Brigade) शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.

विन्स्टन फर्नांडिस यांच्या मालकीचे हे घर आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्न‌िशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. घरात बरीच अडगळ होती व बरेच साहीत्यही साठवून ठेवले होते. त्यामुळे आग फोफावली व आग विझवण्यातही अडथळा निर्माण झाल्याची माहिती अग्न‌िशामक दलातील सूत्रांनी दिली. आग नेमकी कशी लागली त्याचा शोध अग्न‌िशामक दल घेत आहे. 

दरम्यान, गोव्यात सध्या आगीच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन अग्निशामक दलाकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा