तुये हॉस्पिटल २५ जानेवारीपर्यंत गोमेकोशी संलग्न करण्याचे लेखी आश्वासन द्या

अन्यथा २८ जानेवारीपासून आमरण उपोषण : हॉस्पिटल कृती समितीचा इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
तुये हॉस्पिटल २५ जानेवारीपर्यंत गोमेकोशी संलग्न करण्याचे लेखी आश्वासन द्या

पणजी : पेडणेतील (Pernem) तुये हॉस्पिटल (Hospital) गोमेकोशी (Goa Medical College) संलग्न करून कार्यान्वित करण्याचे लेखी आश्वासन सरकारने २५ जानेवारीपर्यंत द्यावे; अशी मागणी तुये हॉस्पिटल कृती समितीने केले आहे. अन्यथा २८ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

तुये हॉस्पिटल गोमेकोशी संलग्न करूनच ते कार्यान्वित करावे. ३० जानेवारी रोजी केवळ सामुदायिक आरोग्य केंद्र या हॉटेलमध्ये स्थलांतरीत करून जनतेची दिशाभूल करू नये, अशी मागणी तुये हॉस्पिटल कृती समितीने केली आहे.

यापूर्वी वरील मागणीसाठी हॉस्पिटल कृती समितीने साखळी उपोषण केले होते. त्याचबरोबर परिसरात मोर्चा काढून जागृती केली होती. आता मागणी पूर्ण न झाल्यास २८ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीने दिला आहे.

हेही वाचा