शैक्षणिक कर्ज योजना : १४०२ लाभार्थ्यांकडून २१ कोटी ३० लाखांची थकबाकी

१ फेब्रुवारीपासून होणार ओटीएस योजना

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
शैक्षणिक कर्ज योजना : १४०२ लाभार्थ्यांकडून २१ कोटी ३० लाखांची थकबाकी

पणजी : उच्च शिक्षणासाठी (Higher Education)  व्याजमुक्त कर्ज योजनेचे १४०२ लाभार्थ्यांकडून २१ कोटी ३० लाखांची थकबाकी आहे. या लाभार्थ्यांना आता एकरकमी योजनेचे (ओटीएस) लाभ घेणे शक्य होणार आहे. उच्च शिक्षण संचालनालयाकडून (Higher Education Directorate) ही माहिती मिळाली. ही योजना १ फेब्रुवारी ते ३१ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. 

गोवा शिक्षण विकास महामंडळाने (Goa Education Development Corporation) २००५ मध्ये ही योजना सुरू केली होती. उच्च शिक्षणासाठी व्याज मुक्त कर्ज देण्याच्या या योजनेचा हजारांनी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मात्र, आता पर्यंत १४०२ विद्यार्थ्यांनी कर्जाचे हप्ते फेडलेले नाहीत. यासाठी सरकारने ओटीएस योजना सुरू केली आहे. १४०२ विद्यार्थ्यांकडून एकूण २१,३०७५६२३ रुपयांची थकबाकी आहे. 

ज्या विद्यार्थ्यांची हप्ते फेडण्याची मुदत संपली आहे; त्यांच्यासाठी ओटीएस योजना अशी आहे.

२ महिन्यांमध्ये थकबाकी भरण्यासाठी : थकबाकी आणि थकबाकीवर ५ टक्के व्याज

४ महिन्यांत थकबाकी भरण्यासाठी : थकबाकी आणि थकबाकीवर १० टक्के व्याज

६ मह‌िन्यांमध्ये थकबाकी भरण्यासाठी : थकबाकी आणि थकबाकीवर १५ टक्के व्याज

हप्ते फेडण्याची मुदत असलेल्यांसाठी 

- ३ महिन्यांत प्रलंबित असलेले हप्ते फेडल्यास दंडाची रक्कम लागू होणार नाही. पुढील हप्ते वेळेत भरावे लागतील. ज्यांनी कर्जाची रक्कम फेडलेली आहे त्यांची दंडाची रक्कम माफ होणार. भरलेल्या दंडाची रक्कम मात्र परत मिळणार नाही. या लाभार्थ्यांनी ‘नो ड्यूज सर्ट‌‌िफिकेट’ मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे कळीत केले आहे. 


हेही वाचा