अभिनेते धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
49 mins ago
अभिनेते धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

मुंबई : मुंबईतील (Mumbai) ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये (Breach candy hospital) उपचार घेणारे बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज अभिनेते आणि हिंदी सिनेमाचे ही - मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज (Discharge from hospital)  देण्यात आला आहे.

आता कुटुंबीय त्यांच्यावर घरीच उपचार करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आज बुधवारी सकाळी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आता कुटुंबीय त्यांच्यावर घरीच उपचार करणार असल्याचे ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी मिडियाला माहिती देताना सांगितले.

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, अभिनेते धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

घरी त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. आता त्यांना व कुटुंबियांना एकांताची गरज असून, कुणीही उगाच काहीही अफवा पसरवू नयेत असे आवाहन केले आहे.

दरम्यान,अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत  ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘धरमवीर’ अशा असंख्य हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

हेही वाचा