बिहारमध्ये एनडीए सुसाट; दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल : महागठबंधनात बिघाडी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
बिहारमध्ये एनडीए सुसाट; दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल : महागठबंधनात बिघाडी

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar assembly election result) सध्या दृष्टीपथात आहेत. सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) (NDA) घोडदौड सुसाट सुरू असून, आघाडीने दणदणीत यश मिळवले आहे. सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. विरोधी पक्षांचे महागठबंधन (Mahagathtbandhan) मोठ्या पराभवाच्या छायेत आहे. 

मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधील जवळजवळ सर्व सर्वेक्षण संस्थांनी एनडीएला मोठा विजय मिळवण्याची शक्यता वर्तवली होती. एक्झ‌िट पोलचा अंदाज खरा ठरला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. 

बिहारमध्ये, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएमध्ये जनता दल संयुक्त (जेडीयू), भारतीय जनता पक्ष (भाजप), लोक जनशक्ती पक्ष (रामविलास), हिंदुस्तान अवामी मोर्चा (एचयूएम) व राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) यांचा समावेश आहे. 

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील अपडेट

बिहार विधानसभा निवडणुकीतील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील ३.१५ वाजल्यानंतरचे अपडेट

भाजप ९५ जागांवर आघाडीवर, जेडीयू ८६ जागांवर आघाडीवर, राजद २४ जागांवर आघाडीवर, एलजेपीआरव्ही १९,  एआयएमआयएम ५, एचएएमएस ५,  आरएसएचटीएलकेएम ४, कॉंग्रेस २,  जनसुराज्य ० व इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत. 



हेही वाचा