मिराबाग बंधार्‍याविरुद्धच्या आंदोलनाला ११ दिवस; सरकारचे दुर्लक्ष : स्थानिकांची खंत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20th February, 05:25 pm
मिराबाग बंधार्‍याविरुद्धच्या आंदोलनाला ११ दिवस; सरकारचे दुर्लक्ष : स्थानिकांची खंत

सांगे : मिराबाग-सावर्डे (Mirabag-Sanvordem) येथे बंधार्‍याविरुद्ध सुरू असलेल्या स्थानिकांच्या आंदोलनाला ११ दिवस उलटले तरी सरकार (Government) दुर्लक्षकरीत असल्याची खंत स्थानिकांनीव्यक्त केली

सरकार काय करायला बघते असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. किती तरी लोक येऊन बंधार्‍याविरुद्धच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मात्र, स्थानिक आमदार व शेजारी असलेले आमदार (MLA) अजून येथे पोहोचलेले नाहीत.लोकांना नको तर आम्हाला ही नको, असे सांगणारे स्थानिक आमदार व जलस्त्रोतमंत्री यांनी येऊन लोकांना भेटायला हवे होते.

सरकारने आता लोकांचा अंत पाहू नये; नाहीतर येथील महिला आक्रमक व्हायला वेळ लागणार नसल्याचा इशारा येथील काही आंदोलन करणार्‍या महिलांनी दिला. आमदार विजय सरदेसाई यांनी मिराबाग येथे जाऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.  त्यांनी सांगितले की, लोकांना जर बंधारा नको तर सरकार कुणासाठी बंधारा आणते? ४०० कोटी बंधार्‍यासाठी खर्च करण्यापेक्षा हाच पैसा शेतीसाठी खर्च करायला हवा होता.

सरकार काही कंपन्यांना मदत करण्यासाठी जलस्त्रोत खात्याचा निधी खर्च करून शेतकर्‍यांवर अन्याय करीत आहे. लोकांना नको तर हा विषय संपायला हवा, आपण हा विषय विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे आमदार सरदेसाई म्हणाले. तारा केरकर म्हणाल्या की, बंधार्‍याची कशासाठी गरज आहे ते पाहूनच हा प्रकल्प हाती घेणे गरजेचे होते. 

हेही वाचा