३९० प्राथमिक शिक्षकांची परीक्षा १५ मार्च रोजी

गोवा कर्मचारी भरती आयोगाकडून वेळापत्रक जाहीर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th February, 05:30 pm
३९० प्राथमिक शिक्षकांची परीक्षा १५ मार्च रोजी

पणजी: गोव्यातील सरकारी मराठी आणि कोकणी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ३९० पदे भरण्यासाठीची संगणक आधारित परीक्षा (CBT) १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. गोवा कर्मचारी भरती आयोगाने या शिक्षक पदांसाठी ३० जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.

या भरती प्रक्रियेद्वारे प्राथमिक शाळेतील मराठी माध्यमाच्या ३५२ जागा, तर कोकणी माध्यमाच्या ३८ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी असून, आज अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आजच आपली प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

दरम्यान, ॲनालिटिकल असिस्टंट (Analytic Assistant) आणि लॅबोरेटरी असिस्टंट (Laboratory Assistant) यांच्या प्रत्येकी एका पदासाठीची सीबीटी परीक्षाही १५ मार्च २०२६ रोजीच घेतली जाणार आहे. या सर्व परीक्षांची वेळ आणि केंद्रे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत; ती लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.

हेही वाचा