About Us

‘गोवन वार्ता’ (GOAN VARTA) हे निर्भीड मराठी दैनिक १८ जून २०१५ रोजी ‘फोमेंतो मीडिया प्रा. लि.’द्वारे (Fomento Media Pvt. Ltd.) (आता ‘प्रुडंट मीडिया (गोवा) प्रा. लि.’ : Prudent Media (Goa) Pvt. Ltd.) सुरू करण्यात आले. स्थानिक बातम्यांवर भर देत ‘गोवन वार्ता’ने अत्यंत कमी कालावधीत संपूर्ण गोव्यावर आपला ठसा उमटवला. ‘गोवन वार्ता’चे वाचक केवळ संपूर्ण गोव्यातच नव्हे, तर शेजारील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि बेळगाव व कारवारसह कर्नाटकच्या सीमावर्ती भागांतही आहेत.

ताज्या, विशेष, एक्सक्लुझिव्ह आणि निःपक्षपाती स्थानिक बातम्या व विशेष लेखांवर प्रामुख्याने भर देत ‘गोवन वार्ता’ने मराठी वाचकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या दैनिकाचे संपादकीय पान अत्यंत लोकप्रिय असून संपादकीयांमध्ये ठाम आणि स्पष्ट मते मांडली जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बातम्या पुरवण्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा आणि व्यावसायिक बातम्यांचा समावेश करतानाच ‘गोवन वार्ता’ दर रविवारी ‘तरंग’ ही साप्ताहिक पुरवणी प्रकाशित करते. ‘तरंग’ ही पुरवणी साहित्य, संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक-राजकीय घडामोडींना समर्पित आहे. विशेषतः महिलांच्या पसंतीस उतरलेली ‘ती’ ही पुरवणी सर्जनशील महिला लेखिकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. ‘तरंग’ आणि ‘ती’ व्यतिरिक्त बालकांसाठी ‘हुप्पा हुय्या’, युवकांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘जीपीएससी/जीएसएससी’, सिनेप्रेमींसाठी ‘सिनेवार्ता’ यांसारख्या इतर पुरण्याही उपलब्ध आहेत.

अत्यंत कमी कालावधीतच ‘गोवन वार्ता’ने समाजातील सर्व स्तरांतील आणि सर्वसामान्य वाचकांसाठी एक खुले आणि मैत्रीपूर्ण व्यासपीठ निर्माण केले आहे. संकेतस्थळ (website) आणि छापील वर्तमानपत्रासोबतच ‘गोवन वार्ता’चे ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजही सक्रिय आहे. तसेच ई-पेपर आणि दिवसभर सतत प्रसारित होणाऱ्या ‘ब्रेकिंग न्यूज’ची मालिकाही वाचकांसाठी उपलब्ध आहे. या सर्व माध्यमांच्या साहाय्याने, बातम्या, विशेष लेख, माहिती आणि ज्ञान यांद्वारे आमच्या वाचकांची सेवा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.


कार्यालय

गोवन वार्ता, तिसरा मजला, फोर्थ इस्टेट (कामत मेट्रोपोलिस),
सांत इनेझ, पणजी-403001, गोवा.

(0832) 2405950

ई-मेल : [email protected]