चेन्नई : चक्रीवादळ 'फेंगल' शनिवारी दुपारी पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर दडक देण्याची शक्यता आहे. फेंगल' चक्रीवादळ वर पुद्दुचेरीच्या किनाऱ्याकडे सरकताना उत्तर तमिळनाडूच्या अनेक भागांत शनिवारी सकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
किनारपट्टी भागात शुक्रवारी रात्री अधूनमधून आणि नंतर पहाटे मुसळधार पाऊस पडला,यामुळे अनेक भागात पाणी साचले आणि सखल भागात असलेल्या मदिपक्कममधील अनेक रहिवाशांनी जवळच्या वेलाचेरी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला त्यांची वाहने पार्क केली. तसेच इतर अनेक भागातील नागरिकांनीही आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी केल्याचे सकाळी दिसून आले.
गेल्या आठवड्याभरापासून, विविध यंत्रणांनी तामिळनाडू तसेच इतर राज्यांतही अलर्ट जारी केले होते. यामुळे येथील सकल बहंगाणत राहणाऱ्या स्थानिकांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. उर्वरित ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात अलाया आहेत. विविध ठिकाणी नागरी कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन आणि बचाव कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे दृश्य दिसत आहे. विमानांचे प्रस्थान आणि आगमन यावरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. चेन्नई मेट्रो रेल्वेने सांगितल्या नुसार त्यांची सेवा सुरळीत चालू आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी पुढील २-३ दिवस प्रवास न करण्याबाबत सचेत केले आहे. दरम्यान, तामिळनाडू आणि इतर राज्यांच्या सरकारांनी आधीच ३० नोव्हेंबरला शैक्षणिक संस्थांसाठी सुट्टी जाहीर केली होती आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंत असू शकतो. वादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. जिल्हा दंडाधिकारी ए कुलोथुंगन यांनी पीडब्ल्यूडी, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचवेळी भारतीय हवामान विभागाने मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. चेन्नई हवामान केंद्राचे संचालक डॉ. एस. बालचंद्रन यांनी उत्तर तामिळनाडू आणि किनारी जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
१) नागपट्टणमसह ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
२) चेन्नईत सकाळी वाजेपर्यंत ५.७ सेमी पाऊस झाला
३) नागापट्टिनम आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये २० सेमी पाऊस अपेक्षित आहे
४) चेन्नईमध्ये १० सेमी पाऊस अपेक्षित आहे
५) वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किमी आणि ताशी ९० किमी.
६) तामिळनाडू सरकारने पूर्ण तयारी केली आहे.
७) ७ जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ तैनात
दरम्यान, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव पडण्याची शक्यता लक्षात घेता, नौदल राज्य प्रशासनाच्या समन्वयाने संवेदनशील भागात आवश्यक ती सर्व मदत देण्यास तयार झाले आहे. चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी पूर्व नौदल कमांड मुख्यालय तामिळनाडू आणि पुद्दुचेरी नौदल क्षेत्राशी समन्वय साधून काम करत आहे. अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधे यासह अत्यावश्यक मदत सामग्रीने वाहने भरली जात आहेत, तर संवेदनशील भागात विशेष पूर मदत पथके तैनात केली जात आहेत. डायव्हिंग टीमनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, ते आवश्यक असल्यास आपत्कालीन बचाव मोहिमेसाठी तयार आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांचे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी अतिवृष्टी आणि वादळाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक बोलावली. जनतेने त्यांच्या घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी अशी विनंती दोघांनी बैठकीनंतर केली आहे.