वेर्णा : मेंदूतील रक्तस्त्रावामुळे १० वर्षीय विद्यार्थ्याचा धक्कादायक मृत्यू

शाळेच्या शौचालयात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्याला आधी मडगाव येथील रुग्णालयात व नंतर गोमेकॉत उपचारासाठी करण्यात आले होते दाखल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th March 2025, 02:07 pm
वेर्णा : मेंदूतील रक्तस्त्रावामुळे १० वर्षीय विद्यार्थ्याचा धक्कादायक मृत्यू

पणजी : नागवा, वेर्णा येथील एका शाळेच्या शौचालयात १० वर्षांचा विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळला. त्यास तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले असता, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.  

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ८ मार्च रोजी घडली होती. प्रकार समोर येताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला सावरत तत्काळ मडगाव येथील रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यास बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. 

दरम्यान मेंदूच्या इंट्रापॅरेन्कायमल भागातील रक्तस्रावामुळे सेरेब्रोव्हस्कुलर आघात झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा