पणजी : केंद्र सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय देशाच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणा राबविण्यासाठी मोलाचा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वी कोणत्याही सरकारने असा निर्णय घेतला नव्हता असे पणजीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिली. गोव्यात भंडारी समाजाच्या नेत्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. जनगणना हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने यावर केंद्र सरकार निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भंडारी समाजातील नेत्यांना दिले होते. जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतल्याने भंडारी समाजाची मागणी मान्य झाली आहे.