गोवा लोकसेवा आयोगाकडून सीबीआरटीच्या पद्धतीत मोठे बदल

सीबीआरटी ७५ ऐवजी ६० गुणांची; उत्तीर्णतेची गुणमर्यादा घटवली


12 hours ago
गोवा लोकसेवा आयोगाकडून सीबीआरटीच्या पद्धतीत मोठे बदल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) सीबीआरटी परीक्षेच्या पद्धतीत बदल करताना पेपर ७५ ऐवजी ६० गुणांंचा केला आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी गुणांंची मर्यादा कमी करून ती ६० टक्यांंवरून ५० टक्के केली आहे.
सीबीआरटी परीक्षेच्या नव्या पद्धतीची कार्यवाही १ नोव्हेंंबर २०२५ पासून सुरू होईल. त्यापूर्वीच्या परीक्षा जुन्या पद्धतीनुसारच होतील. नव्या सीबीआरटी परीक्षेच्या पद्धतीची नोटीस गोवा लोकसेवा आयोगाने जारी केली आहे. सरकारी महाविद्यालयातील शैक्षणिक पदांंसह अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांंची भरती गोवा लोकसेवा आयोगामार्फत होते. सर्व पदांंसाठी सीबीआरटी (कॉम्प्युटर बेसड रीक्रुटमेंंट टेस्ट) द्यावीच लागते. आता परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
सीबीआरटी परीक्षेनंतर पुढील प्रक्रियेसाठी आयोग पदांंच्या पाचपटीने उमेदवारांंची निवड करेल. ही निवड सीबीआरटीच्या गुणांंवर आधारित असेल. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
नव्या पद्धतीप्रमाण शैक्षणिक पदांसाठी इंग्रजी (क्राम्प्रेहेंंशन) १० गुण, सामान्य ज्ञान १० गुण, लॉजिकल रिझनिंग १० गुण आणि कोर ३० गुण असतील.
शैक्षणिक पदांंव्यतिरिक्त अन्य पदांसाठी इंग्रजी (क्राम्प्रेहेंंशन) १० गुण, सामान्य ज्ञान ५ गुण, लॉजिकल रिझनिंग १० गुण आणि कोर २५ गुण असतील.
सीबीआरटी परीक्षा पद्धतीत केलेले बदल
सीबीआरटी पेपर ७५ गुणांंऐवजी ६० गुणांंचा असेल.
यापूर्वी पेपर लिहिण्यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जात होता, यापुढे ७५ मिनिटे दिली जातील.
सर्वसामान्य/इडब्ल्यूस गटासाठी उत्तीर्ण होण्यासाठी ६० टक्के गुणांंची (४५ गुण) आवश्यकता होती. यापुढे ५० टक्के गुण (३० गुण) पुरेसे असतील.
ओबीसी/पीडब्ल्यूडी/सीएफएफ गटासाठी उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्के गुणांंऐवजी ४५ टक्के गुण आवश्यक असतील.
एससी/एसटी गटासाठी उत्तीर्ण होण्याला ५० टक्के गुणांंऐवजी ४० टक्के गुण आवश्यक असतील.

हेही वाचा