फेणी, हुर्राक बंगळुरुत : तेथे मार्केट उपलब्ध

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
फेणी, हुर्राक बंगळुरुत :  तेथे मार्केट उपलब्ध

बंगळुरू : झिंग आणणारी फेणी, हुर्राक यासाठी जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले गोवा राज्य प्रसिद्ध आहे. या हंगामी पेयाची चव चाखण्यासाठी व जाताना एक तरी बाटली घेऊन जाण्यासाठी अनेकांचे पाय गोव्याकडे वळत असतात. गोव्यातील निसर्ग, समुद्रकिनारे, प्रसिद्ध पर्यटनस्थळांबरोबरच फेणी, हुर्राक यांची चव चाखण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक गोव्याकडे येत असतात. हे फेणी महात्म्य तसे खूप मोठे आहे.

अशा या फेणी हुर्राकला कर्नाटकातील बंगळुरूत मार्केट उपलब्ध झाले आहे. सप्टेंबरपासून बंगळुरूतील मद्य दुकानात फेणी, हुर्राक मिळू लागले आहे. गोव्यात त्याची किंमत ५०० एमएलला ६०० रुपये असली तरी बेंगळुरूत १३०० रुपयांना मिळणार आहे. सोडा, मीठ टाकून फेणीचा आस्वाद घेताना अनेकांना गोव्यात असल्याचा 'फिल' येतो. दर्जेदार फेणी, हुर्राक मिळवण्यासाठी ही अनेकांची गोव्यालाच पसंती असते.

फेणी दोतोर म्हणून ओळखले जाणारे 'काझुलो'चे संस्थापक हॅन्सल वाझ यांनी ही फेणी, हुर्राकला कर्नाटकातील बंगळुरूत मार्केट उपलब्ध करून दिली आहे. बंगळुरू हे भारतीय मद्य पेयाचे एक महत्त्वाचे मुख्य केंद्र म्हणून पुढे येत आहे. वाझ यांनी 'रेडी टु ड्रींक' कॉकटेलच्या (botteld as Mr. Jerry's X Cazulo EI Classico) रुपात बेंगळुरू मेट्रो शहरात फेणी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा