भूखंड देण्याचे आमिष दाखवून एकाची ४२.५० लाखांना फसवणूक

मडगावात गुन्हा दाखल; तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
भूखंड देण्याचे आमिष दाखवून एकाची ४२.५० लाखांना फसवणूक

मडगाव: पेडा, मडगाव येथील महेश बोरकर यांची भूखंड देण्याच्या बहाण्याने तब्बल ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कमलेश मुन्शीभाई कारेलिया (रा. फातोर्डा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेश बोरकर यांनी या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, मार्च ते जुलै २०२४ या कालावधीत संशयित कारेलिया याने बोरकर यांना निवास उभारणीसाठी भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्याने बोरकर यांच्याकडून ४२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही त्याने बोरकर यांना भूखंड दिला नाही किंवा पैसे परत केले नाहीत.

पोलिसांनी बोरकर यांच्या तक्रारीची दखल घेत प्राथमिक तपास केला आणि त्यानंतर संशयित कारेलिया याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुष्का परब करत आहेत.

हेही वाचा