दिल्ली बॉंबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सतर्कता : मुख्यमंत्री

बॉम्बस्फोटातील मृत्यूंबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
11th November, 02:50 pm
दिल्ली बॉंबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सतर्कता : मुख्यमंत्री

पणजी : दिल्ली बॉंबस्फोटाच्या (Delhi Bomb Blast) पार्श्वभूमीवर गोव्यातही (Goa) सतर्कता (हाय एलर्ट) (High Alert)  बाळगली जात आहे. यासाठी पोलिसांनी (Goa Police) तपासणी सुरू केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले. दिल्ली बॉंबस्फोटातील मृत्यूंबद्धल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

दिल्लीतील बॉंबस्फोटात ९ जणांचा मृत्यू होण्याबरोबर बरेच जण जखमी झाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी बॉंबस्फोट झालेल्या ठिकाणाला भेट देण्याबरोबर इस्पितळात जाऊन जखमींची विचारपूस केली.

केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे बॉंबस्फोटाचा तपास सुरू आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून गोव्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्याबरोबर पोलिसानी सुरक्षेचे उपाय घेण्यास सुरवात केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. 

बॉंबस्फोटानंतर पोलिसांनी पर्रा येथे नाकाबंदी केली. केरी चेक नाका, थिवी रेल्वे स्टेशन येथेही कसून तपासणी केली.