
पणजी: केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry of Road and Highways) गोवा-खानापूर सीमेवरील (Goa-Khanapur Border) तिनईघाट (Tinai Ghat) (एनएच ७४८) येथे टोल आकारल्यानंतर खानापूरहून कर्नाटकमार्गे प्रवास करणाऱ्या गोव्यातील लोकांना आता टोल भरावा लागेल.
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने एका अधिसूचनेत टोल शुल्क निश्चित केले आहे.
तीनईघाट येथे एक टोल प्लाझा बांधला जाईल.
तीनईघाटापासून ३७ किमीच्या पट्ट्यासाठी टोल असेल. कार, जीप आणि व्हॅनसाठी हा दर ०.६५ रुपये प्रति किमी आणि लहान व्यावसायिक वाहनांसाठी १.०५ रुपये प्रति किमी असेल. ट्रक किंवा बससाठी हा टोल प्रति किमी २.२० रुपये आणि सहा चाकी वाहनांसाठी २.४० रुपये प्रति किमी असेल.
अवजड यंत्रसामग्री वाहनांसाठी हा टोल प्रति किमी ३.४५ रुपये असेल. टोल प्लाझापासून २० किमीच्या आत राहणाऱ्यांसाठी पास उपलब्ध असेल. यावर्षी, पासची किंमत दरमहा ३४० रुपये असेल.