दिल्लीत बॉम्ब स्फोटांची मालिका घडवून आणण्याचा होता कट

नवी दिल्ली: १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात आता एक मोठे वळण आले आहे. तपास यंत्रणा स्फोटात वापरलेल्या गाड्यांव्यतिरिक्त आणखी एका मारुती ब्रेझा (Maruti Brezza) कारचा शोध घेत आहेत. हा दहशतवादी मॉड्यूल एकाच वेळी अनेक वाहने कशासाठी वापरत होता, याचा सखोल तपास आता सुरू झाला आहे.

तीन गाड्यांचा संशयास्पद वापर
लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये स्फोट झाला होता. त्यानंतर डॉ. उमर मोहम्मद याची इकोस्पोर्ट (Eco Sport) कार फरीदाबादमध्ये बेपत्ता अवस्थेत आढळली. आता तपास यंत्रणांसमोर तिसरी ब्रेझा कार शोधण्याचे आव्हान आहे. सूत्रांनुसार, टेरर मॉड्यूलमधील दहशतवादी बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याचा कट रचत होते पण, पोलीस आणि तपासयंत्रणांनी जम्मू काश्मीर आणि इतर ठिकाणी अनेक ठिकाणहून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केल्यानंतर त्यांच्या योजना उघड झाल्या.

बॉम्ब घेऊन कनॉट प्लेसमध्ये!
स्फोटाच्या काही तास आधीचा एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये हल्लेखोर डॉ. उमर मोहम्मद बॉम्बस्फोटकांनी भरलेली i20 कार घेऊन दिल्लीत जाणाऱ्या कनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलवरून (Outer Circle) दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी जाताना दिसत आहे. त्यानंतर तो मयूर विहारमार्गे लाल किल्ल्याच्या दिशेने गेला.

डीएनए चाचणीतून ओळख निश्चित
दिल्ली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या अवशेषामधून गोळा केलेल्या हाडांचे तुकडे, दात आणि कपड्यांच्या अवशेषांचे डीएनए नमुने डॉ. उमर मोहम्मद याची आई आणि भावाच्या नमुन्यांशी १०० टक्के जुळले आहेत. यामुळे स्फोटाच्या वेळी गाडीत डॉ. उमरच उपस्थित होता, यावर आता पूर्ण शिक्कामोर्तब झाले आहे.

तीन दिवसांतील तपास (१० ते १३ नोव्हेंबर):
)
एनआयएच्या पथकांनी घटनास्थळाला पूर्णपणे सील केले असून, स्फोटकांचे अवशेष, वाहनांचे सुटे भाग आणि डिजिटल पुराव्यांचे सखोल न्यायवैद्यक (Forensic) परीक्षण सुरू आहे, जेणेकरून या हल्ल्यामागील संपूर्ण नेटवर्कचा माग काढता येईल.