दिल्ली कार बॉंबस्फोट : दिल्लीवर ड्रोन, रॉकेटने बॉंबस्फोट करण्याचा होता कट

बॉंब स्फोटात बूटबॉंबचा वापर : जासीस बिलाल वाणीला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
दिल्ली कार बॉंबस्फोट : दिल्लीवर ड्रोन, रॉकेटने बॉंबस्फोट करण्याचा होता कट

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या कार बॉंब स्फोटानंतर (Car Bomb Blast) आता नवीनवी माहिती पुढे येत आहे. तपास यंत्रणांनी याप्रकरणी अनेकांना अटक केली असून, त्यात बहुतेक डॉक्टरांचा समावेश आहे.

दिल्लीवर ड्रोन (Drone), रॉकेटने बॉंबस्फोट करण्याचा कट होता असे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी एनआयएने जासीस बिलाल वाणी ऊर्फ दानिश या आणखी एकाला श्रीनगर येथून अटक केली आहे. उमर याचा तो साथीदार आहे.  दिल्लीतील बॉंबस्फोटात बूटबॉंबचा वापर केल्याचेही समोर आले आहे.

‘बूटबॉंब’ने घडविण्यात आलेल्या स्फोटात अमोनियम नायट्रेटसह ट्रायअॅसीटोन ट्रायपेरॉक्साईड (टीएटीपी) या अतिशय घात व एकदम धोकादायक व संवेदनशील स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. 

डॉ. उमर मोहम्मद याने जे बूट घातले होते त्या बुटांमध्ये बॉंब पेरण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.

लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात आय २० कार वापरण्यात आल्या होत्या.  कार चालक बसलेल्या ठिकाणी बूट सापडला होता.

त्यात स्फोटकांचे अंश सापडले व बुटातच बॉंब पेरला होता. हाच पहिला ट्र‌िगर असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. फॉरेन्सिक पथकाला टायर व बुटातून टीएटीपी या स्फोटकाचे अवशेष सापडले.

जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी या स्फोटकांचा बराच मोठा साठा करून ठेवला होता. असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. 

हेही वाचा