
पणजी : गोव्यातील (Goa) पर्यटन (Tourism) हंगाम तेजी घेत आहे. पोलंडहून (Poland) हंगामातील पहिले चार्टर विमान (Charter Flight) मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mopa Manohar International airport) उतरले. सोमवारी उतरलेल्या विमानात १८५ जण होते.
पर्यटन विभागाने सांगितले की, पोलिश पर्यटकांसाठी गोवा हा सलग दुसरा पर्यटन हंगाम आहे. त्यांच्यासाठी दीर्घ पल्ल्याचे ठिकाण आहे.
“जागतिक पर्यटन भागीदारी मजबूत करण्यासाठी हे आगमन एक सकारात्मक पाऊल आहे. आणि सरकारने दर्जेदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे, कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि गोव्याची संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक आकर्षणे प्रदर्शित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,” असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले की, युरोपातून गोव्याला मागणी व पसंती वाढत आहे. गोव्यात येत असलेल्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, चांगले स्वागत व वागणूक मिळावी, चांगला अनुभव घेऊन पर्यटक जावेत, यासाठी पर्यटन खाते प्रयत्नरत आहे. सुविधा सुधारण्यावर खात्याचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.