बेतकी खांडोळा पंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव

९ पैकी ५ पंचसदस्यांनी केली स्वाक्षरी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
21 mins ago
बेतकी खांडोळा पंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव

माशेल : गोव्यातील (Goa) ) त‌िवरे वरगाव पंचायतीनंतर आता बेतकी खांडोळा पंचायतीचे (Betqui-Candola Panchayat)  सरपंच (Sarpanch) विशांत नाईक व उपसरपंच संजीवनी तळेकर यांच्या विरुद्ध अविश्वास नोटीस जारी (No confidance motion) करण्यात आली आहे.

यावर ९ पैकी ५ पंचसदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्याची प्रत फोंडा गटविकास अधिकारी कार्यालयात (BDO office Ponda) सोमवारी सादर करण्यात आली आहे. 

अविश्वास ठरावावर पंच सदस्य मनोज कुमार गावकर, निकिता फडते, उदय नाईक, दिलीप नाईक व श्रध्दा फडते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विकास कामांमध्ये किंवा पंचायती संबंधी कुठलाही निर्णय घेताना पंच सदस्यांना विश्वासात न घेणे, पंचायती मध्ये विविध कामे घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांसाठी वेळ न देणे, अशी विविध कारणे सरपंच व उपसरपंचावर दाखल केलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे दोन महिन्यापुर्वी सरपंच विशांत नाईक व उपसरपंच संजीवनी तळेकर यांच्या विरुद्ध अविश्वास दाखल करण्यात आला होता व तो बारगळला होता. त्यामागे स्थानिक आमदार गोविंद गावडे राजकीय रणनीती होती. 

या पंचायतीवर स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्या सर्मथक मंडळाचे वर्चस्व असून ऐन जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीच्या तोंडावर त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पुढील सरपंच म्हणून दिलिप नाईक व मनोजकुमार गावकर यांच्या नावांची चर्चा सध्या चालू आहे.

हेही वाचा