दरोड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
दरोड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

पणजी : गोव्यातील (Goa) दरोड्यासारख्या (Dacoity)  गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील. बायणा येथील दरोडाप्रकरणी कडक कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.

उपाययोजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ट पातळीवर पोलिसांची बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बायणा (Baina) येथील चामुंडी आर्केड इमारतीत मंगळवारी मध्यरात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे संपूर्ण राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गणेशपुरी - म्हापसा येथील दरोड्याला जेमतेम दीड महिना उलटला असतानाच बायणा येथे सशस्त्र दरोडा पडला. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड या विरोधी पक्षांनी सरकारवर कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला आहे.

दरोड्याला चोवीस तास उलटल्यानंतरही अद्याप कोणाही संशयिताला अटक झालेली नाही. बायणा दरोड्याच्या तपासाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.

दरोड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आवश्यक : श्रीपाद नाईक

दरोड्यांसारखे गुन्हे नियंत्रणात ठेवण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस गुन्हेगार​ निर्ढावत आहेत. नागरिकांनी सुद्धा सजग राहण्याची गरज आहे, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यानी म्हटले आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडली : अमित पाटकर 

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी हस्तक्षेप करण्याची गरज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. 

हेही वाचा