बेकायदेशीर धर्मांतरासंदर्भातील गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाकडून याचिका निकाला

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
2 hours ago
बेकायदेशीर धर्मांतरासंदर्भातील गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाकडून याचिका निकाला

पणजी : बेकायदेशीर धर्मांतराच्या आरोपावरून २०२२ मध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने निकालात काढली आहे. डॉम्निक डिसोझा यांच्या पत्नी जुआन मास्कारेन्हस यांनी ही याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी सुरू असताना, उच्च न्यायालयात गुन्हा शाखेने महत्त्वपूर्ण माहिती दिली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्यामुळे, कनिष्ठ न्यायालयात अंतिम अहवाल आधीच सादर करण्यात आला आहे, असे गुन्हा शाखेने न्यायालयाला कळवले. गुन्हा शाखेचा हा अहवाल विचारात घेऊन उच्च न्यायालयाने या याचिकेवर आता पुढील हस्तक्षेपाची गरज नाही, असे नमूद करत याचिका निकालात काढली.

सडये-शिवोली येथील बिलिव्हर्स संघटना चालवून बेकायदेशीररीत्या धर्मांतर करीत असल्याचा आरोप या दोघांवर होता.

हेही वाचा