किनारपट्टी भागात रात्री १० नंतर चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरूच

बार आणि रेस्टॉरंट मालकांचे नुकसान होत असल्याची तक्रार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22nd November, 05:03 pm
किनारपट्टी भागात रात्री १० नंतर चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरूच

बागा: गोव्यात रात्री १० नंतर दारू विक्रीवर बंदी असतानाही, काही वाईन शॉप्स चोरट्या मार्गाने बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याच्या तक्रारी बार आणि रेस्टॉरंट मालकांनी केल्या आहेत. यामुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे, असे ते म्हणाले.



बागा येथील स्नो पार्क लेनपुढील वाईन शॉप्समध्ये, शटर बंद करून रात्री उशिरापर्यंत मागच्या दारातून दारूची विक्री सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. स्थानिक रेस्टॉरंट मालकांचे म्हणणे आहे की, हे अनधिकृत विक्रेते रात्री उशिरापर्यंत दारू विकत असल्याने, त्यांचे ग्राहक बार आणि रेस्टॉरंटमध्ये येत नाहीत. या बेकायदेशीर विक्रीकडे अबकारी खात्याने दुर्लक्ष केल्याने रेस्टॉरंट मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा