सरकारी सेवेत ५० टक्के कर्मचारी बारावीपर्यंत शिक्षित

उच्चशिक्षितांचे प्रमाण वाढले : महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येतही सकारात्मक वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd November, 10:19 pm
सरकारी सेवेत ५० टक्के कर्मचारी बारावीपर्यंत शिक्षित

पणजी : गोव्यातील सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांबाबतची महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. सांख्यिकी खात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक सरकारी कर्मचारी हे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहेत. त्याचबरोबर, गेल्या पाच वर्षांत उच्चशिक्षित आणि महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

या अहवालात सरकारी खाती, स्वायत्त संस्था, अनुदानित संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ३१ मार्च २०२४ अखेरीस राज्यात एकूण ६३ हजार ९७० सरकारी कर्मचारी होते. यापैकी ५०.०१ टक्के कर्मचारी पहिली ते बारावी उत्तीर्ण आहेत. तांत्रिक आणि उच्च शिक्षणाकडे कल वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या १.१० टक्क्यांनी वाढली आहे.

कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता (टक्केवारी)

पदवीधर (Graduate) २६.२८%
संख्या: १६,८१३
दहावी पास (SSC) १७.६५%
संख्या: ११,२९५
बारावी पास (HSSC) १५.६३%
संख्या: १०,००१
नववी पास १३.५०%
संख्या: ८,६३८
पदव्युत्तर (Post Graduate) ११.९६%
संख्या: ७,६५५

‘क’ गटातील कर्मचाऱ्यांचे वर्चस्व
प्रशासकीय संरचनेतही बदल झाले आहेत. २०१९ मध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५.७० टक्के कर्मचारी ‘ड’ गटातील होते. २०२४ मध्ये ही संख्या निम्म्याहून कमी होऊन २.४८ टक्क्यांवर (१,५८८) आली आहे. दुसरीकडे, ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

‘क’ गट (Group C)
७६.२७%
एकूण कर्मचारी: ४८,७९२ (वाढ झाली)
‘ड’ गट (Group D)
२.४८%
एकूण कर्मचारी: १,५८८ (घट झाली)

महिला कर्मचाऱ्यांचा टक्का वाढला

२०१९ मध्ये ३५.७४% असणारे महिलांचे प्रमाण २०२४ मध्ये वाढून ३६.५१% झाले आहे.

#Goa #GovernmentEmployees #Statistics #Education #WomenEmpowerment
हेही वाचा