नाईट क्लब, रेस्टॉरंंटांच्या सुरक्षा ऑडिटसाठी विशेष समिती

एसओपीसह सुरक्षा उपायांचा सादर होणार अहवाल


8 hours ago
नाईट क्लब, रेस्टॉरंंटांच्या सुरक्षा ऑडिटसाठी विशेष समिती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाईट क्लब, बार, रेस्टॉरंंट तसेच संंबंंधित आस्थापनांच्या सुरक्षा ऑडिटसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती परवान्यांंसाठी मार्गदर्शक तत्त्वे, तसेच सुरक्षा उपायांविषयी एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
आयएएस अधिकारी संंदीप जॅकीस हे या समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, अर्थ खात्याचे संयुक्त सचिव प्रणव भट्ट, सार्वजनिक बांंधकाम खात्याचे मुख्य अभियंंते (इमारत) संंदीप चोडणकर, अग्निशामक दलाचे उपसंंचालक राजेंद्र हळदणकर हे या समितीचे सदस्य आहेत.
विशेष समितीचे कार्य आणि अधिकार
अग्निशमन ना हरकत दाखला, इलेक्ट्रिकल सेफ्टी, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी परवाने, तसेच अन्य सुरक्षा उपयांंची वेळोवेळी तपासणी करणे
क्लब, रेस्टॉरंंटसाठी अग्निशमन यंंत्रणा, इमर्जन्सी एक्झिट, गर्दीवर नियंंत्रण ठेवणे याविषयी उपाययोजना सुचवणे
सुरक्षा उपायांची योग्य अंमलबजावणी न केल्यास आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करणे
आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करणे