क्लबचा भागीदार अजय गुप्ताला अटक

क्लबचे मालक गौरव, सौरभ लुथराविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस


8 hours ago
क्लबचा भागीदार अजय गुप्ताला अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हडफडे येथील ‘रोमिओ लेन’ क्लब दुर्घटनेप्रकरणी अजय गुप्ता या क्लबच्या एका भागीदाराला पोलिसांनी मंगळवारी दिल्लीत अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

फुकेत (थायलंंड) येथे पळून गेलेल्या ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांना ताब्यात घेण्याचे पोलिसांंचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे. क्लबशी संबंधित असलेले (भागीदार) अजय गुप्ता आणि सुरिंदरकुमार खोसला हेही मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले आहे. गौरव आणि सौरभ लुथरा यांना पासपोर्ट कार्यालयानेही नोटीस बजावली आहे. नोटिसीला सात दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची कारवाई होऊ शकते.


शनिवारी रात्री हडफडे येथील रोमिओ लेन क्लबला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांंनी भारतीय न्याय संंहितेच्या कलम १०५, १२५, १२५ (ए), १२५ (बी), २८७ आणि ३ (५) कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. हणजूण पोलीस पुढील तपास करत आहेत. आगीची दुर्घटना घडली तेव्हा सौरभ आनी गौरव लुथरा गोव्यात नव्हते, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी दिली. इंंटरपोलच्या मदतीने त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांंनी दोघांच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी दिली. क्लबचे भागीदार अजय गुप्ता आणि सुरिंदरकुमार खोसला हेही पोलिसांना दिल्लीतही मिळाले नाहीत. त्यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.
पासपोर्ट होणार जप्त
पासपोर्ट कार्यालयाने हडफडे येथील बर्च क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांना नोटिसा जारी केल्या आहेत. या नोटिसांना त्यांनी ७ दिवसांत उत्तर देणे अपेक्षित आहे. त्यांनी समयमर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचा पासपोर्ट जप्त केला जाऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.


निलंबित अधिकाऱ्यांंकडून कागदपत्रे घेतली ताब्यात
आगीच्या दुर्घटनेनंतर निलंंबित केलेल्या तत्कालीन पंंचायत संंचालक सिद्धी हळर्णकर आणि प्रदूषण नियंंत्रण मंंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांनी चौकशीसाठी मंगळवारी हणजूण पोलीस स्थानकात हजेरी लावली. तत्कालीन पंंचायत सचिव रघुवीर बागकर यांचीही यावेळी चौकशी करण्यात आली. हणजूण पोलिसांंनी तिघांनाही चौकशीला हजर राहण्याबाबत सोमवारी नोटीस बजावली होती. चौकशीवेळी पोलिसांंनी या अधिकाऱ्यांंकडून कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.