७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री पोलीस सुवर्ण पदकासाठी निवड

गोवा मुक्तिदिनी होणार वितरण


8 hours ago
७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री पोलीस सुवर्ण पदकासाठी निवड

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पोलीस खात्यात सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल ७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री पोलीस सुवर्ण पदकासाठी निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, १९ रोजी गोवा मुक्तिदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत याच्या हस्ते पदकांचे वितरण करण्यात येणार आहे. या संदर्भात गृह खात्याचे अवर सचिव मंथन मनोज नाईक यांनी आदेश जारी केला.
सुरक्षा विभागाचे उपअधीक्षक सागर एकोस्कर, गुन्हा शाखेचे उपअधीक्षक राजेश कुमार, मडगाव मानवी तस्करी विभागाचे निरीक्षक सुदीक्षा नाईक, साळगाव पोलीस स्थानकातील साहाय्यक उपनिरीक्षक सुभाष मालवणकर, सुरक्षा विभागाचे हवालदार भालचंद्र सावंत, सांगे पोलीस स्थानकाचे हवालदार मेल्विन डायस आणि मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे काॅन्स्टेबल अमरदीप चौधरी यांची निवड मुख्यमंत्री सुवर्ण पदकासाठी करण्यात आली आहे.