२.९० लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई : ७४८३ तपासणी मोहिमा

मडगाव : कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर तिकीटाविना प्रवास करणार्यांवर कारवाई करुन रेल्वे प्रशासनाने १७.८३ कोटींचा महसूल (Revenue) जमा केला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ७४८३ तिकीट तपासणी मोहिमा राबवून २.९० लाख विनातिकीट प्रवाशांवर (Passangers) दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणार्यांची संख्या वाढत असल्याने कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमा तीव्र केल्या आहेत. विनातिकीट प्रवास करणार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. यातून कोकण रेल्वेने तिकीटविरहित प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या विभागात तिकीट तपासणी मोहिमांना वेग दिला आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर ७४८३ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये अनधिकृत तसेच अनियमित प्रवास करत असल्याची ७४८३ प्रकरणे आढळून आली. ज्यामुळे रेल्वे भाडे आणि दंड असे मिळून १७.८४ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात २.३३ कोटी दंड वसूल
कोकण रेल्वे मार्गावरील कारवाईत वाढ होत असतानाच उत्सवाच्या दिवसांत दंडाची रक्कम वाढलेली दिसते. नोव्हेंबर २०१५ या एकाच महिन्यात १०७० विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. ज्यामध्ये ४२,९६५ अनधिकृत व अनियमित प्रवासी आढळून आले. भाडे आणि दंड असे मिळून २.३३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
वैध तिकीट काढून प्रवासाचे आवाहन
कोकण रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि कोकण रेल्वेच्या पूर्ण मार्गावर यापुढेही तिकिट तपासणी मोहिमा अधिक लक्ष केंद्रित करून सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वैध तिकीट काढून प्रवासाचे आवाहन
कोकण रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि कोकण रेल्वेच्या पूर्ण मार्गावर यापुढेही तिकिट तपासणी मोहिमा अधिक लक्ष केंद्रित करून सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.