
वास्को : न्यू वाडे, वास्को (Vasco) येथील सेंट अँथनी नी चॅपेल, फंड पेटीची तोडफोड केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी (Goa Police) नवनीत सिंग (३० वर्षे) याला अटक केली आहे. मानसिक स्थिती बिघडल्याने त्याने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सकाळी वरील चॅपेल व फंड पेटीची तोडफोड केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी येऊन तपास सुरू केला असता, जवळच असलेल्या सीसीटीव्ही मध्ये एक इसम नग्न फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी नौदलात (Navy) नोकरी करीत असल्याची माहिती मिळाली. आयएनएस जीवंती मध्ये नोकरीला आहे.
दरम्यान, त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने, त्याने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात वास्को पोलीस अधिक तपास करीत आहेत.