
तेलंगणा : एक मत काय करू शकते याचा प्रत्यय तेलंगणातील (Telangana) एक महिला घेत आहे. अमेरिकेत (America) असलेला तिचा सासरा सुनेला मतदान करण्यासाठी तेलंगणात आला व त्यांनी सुनेला मतदान केले. सासऱ्याच्या एका मताने सून ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) निवडून आली व सरपंच बनली. याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील लोकेश्र्वरम मंडल येथील ग्रामपंचायत बागापूरसाठी मतदान पार पडले. सूनबाई निवडणुकीत उभ्या असल्याने सासरा अमेरिकेतून आला व त्यांनी मतदानाच हक्क बजावला. निकाल पाहिल्यानंतर सूनबाई थेट एका मताने निवडून येऊन सरपंच झाल्या.
सरपंच झालेल्या महिलेचे नाव मुत्याला श्रीवेधा असे आहे. सासरे इंद्रकरण रेड्डी अमेरिकेतून मतदान करण्यासाठी गावात आले होते. मतमोजणी झाल्यावर ४२६ मतदारांपैकी ३७८ जणांनी मतदान केले.
श्रीवेधा यांना १८९ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला १८८ मते मिळाली. त्यावरून सून श्रीवेधा एका मताने विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एक मत काय करू शकते त्याची चर्चा रंगू लागली.