अजय गुप्ताला ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पणजी : गोव्यातील (Goa) हडफडे येथील बर्च बाय रोमीयो क्लब (Birch by Romeo Lane Club) आग (Fire) दुर्घटनाप्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) अटक केलेले मालक सौरभ व गौरव लुथरा या दोघांना म्हापसा (Mapusa) येथील न्यायालयाने (Court) अतिरिक्त ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणातील आणखी एक संशयित अजय गुप्ता याला ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बर्च बाय रोमीयो क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सौरभ व गौरव लुथरा थायलंड येथे पळून गेले होते. त्यानंतर केंद्र सरकारने थायलंड देशाशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या दोघांना इंटरपोलने दिल्लीत आणले होते. त्यानंतर या दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेऊन रितसर अटक केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी पुन्हा त्यांना म्हापसा येथील न्यायालयात उभे केले असता, अतिरिक्त ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.