६ वर्षीय शालेय बालिकेवर लैंगिक अत्याचार : अटक केलेल्या वाहन चालकाला ७ दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी वाहन केले जप्त

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
६ वर्षीय शालेय बालिकेवर लैंगिक अत्याचार : अटक केलेल्या वाहन चालकाला ७ दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा : गोव्यातील (Goa) बार्देश (Bardez ) तालुक्यातील एका ६ वर्षीय शालेय मुलीवर मुलांना शाळेत सोडणाऱ्या खासगी शाळा वाहन चालकाकडून लैंगिक (Rape) अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी अल्लाबक्ष सय्यदाबडे (४६ रा. पर्वरी) याला अटक केली आहे. त्याचे वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. 

मागील महिनाभरापासून हा प्रकार सुरू होता. तर पीडित मुलीच्या पालकांना ही गोष्ट रविवारी समजली. पीडित मुलीच्या हावभावामध्ये बदल झाल्याचे फिर्यादी पालकांना दिसून आले. नंतर त्यांनी तिची विचारपूस केली तेव्हा संशयित स्कूल वाहन चालक काका हा आपल्याकडे चाळे करत असल्याचे तिने सांगितले.

मुलीने सांगितलेला प्रसंग हा फिर्यादी पालकांसाठी धक्कादायी होता. त्यांनी लगेच पर्वरी पोलिसांत तक्रार गुदरली. पीडित मुलगी ही बार्देश तालुक्यातील एका विद्यालयात शिकत असून, तिला शाळेत नेआण करण्यासाठी संशयिताच्या वाहनाची व्यवस्था तिच्या पालकांनी केली होती. पीडित मुलगी ही सदर गाडीमध्ये सर्वात प्रथम चढत होती आणि शाळा सुटल्यानंतर सर्वात शेवटी उतरत होती. त्यामुळे ती गाडीत  काहीवेळ एकटीच असायची याची संधी घेत संशयिताने पीडितेवर हा अत्याचार केला. 

तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि सोमवारी संशयिताला अटक केली. म्हापसा न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून; पुढील तपास पोलीस करीत आहेत.


हेही वाचा