बेपत्ता असलेल्या शाळकरी मुलीला वास्को पोलिसांनी आणले शोधून : केले कुटुंबियांच्या स्वाधिन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बेपत्ता असलेल्या शाळकरी मुलीला वास्को पोलिसांनी आणले शोधून : केले कुटुंबियांच्या स्वाधिन

वास्को : गोव्यातील (Goa) वास्को पोलीस (Vasco Police) स्थानक हद्दितून बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला (Minor Girl)  वास्को पोलिसांनी दिल्ली (Delhi) येथून शोधून आणले. त्यानंतर कुटुंबियांच्या स्वाधिन केले.

वास्को येथील एका सरकारी माध्यमिक शाळेच्या परिसरातून ही मुलगी बेपत्ता झाली होती. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर भारतीय न्याय संहिता (बीएसएस) २०२३ च्या कलम १३७ आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून तत्काळ दिल्लीला पाठवले.

तांत्रिक यंत्रणेचा वापर करून व माहितीदारांकडून माहिती घेऊन पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा यशस्वीपणे शोध घेतला. नंतर तिला गोव्यात आणण्यात आले. कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आले. पोलिसांनी स्थापन केलेल्या पथकात उपनिरीक्षक वैभव नाईक, उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस, उपनिरीक्षक मयूर सावंत, महिला उपनिरीक्षक अपुर्वा चोडणकर, पोलीस कर्मचारी व्यंकटेश यांचा समावेश होता. 


हेही वाचा