गोव्यातील भोमा येथे दुचाकीच्या धडकेत एक ठार : दोन दुचाकींमध्ये अपघात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
05th January, 11:56 am
गोव्यातील भोमा येथे दुचाकीच्या धडकेत एक ठार : दोन दुचाकींमध्ये अपघात

पणजी : गोव्यातील (Goa) भोमा पंचायतीजवळ (Bhoma Panchayat) हिरो होंडा स्प्लेंडरची (Hero Honda Splendor) धडक व्हेस्पा स्कूटरला (Vespa scooter) बसून झालेल्या अपघातात मुकुंद सरनाईक (४४ वर्षे) हा स्कूटरस्वार ठार झाला. बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला.

विश्वजित गावडे (२८ वर्षे) हा युवक हिरो होंडा मोटरसायकल घेऊन बाणस्तारीहून कुंडईच्या दिशेने जात होता. मुकुंद सरनाईक हा आपली व्हेस्पा स्कूटर घेऊन कुंडईहून बाणस्तारीच्या दिशेने येत होता. भोमा पंचायतीजवळ हा अपघात घडला.  धडक बसल्यानंतर मुकुंद सरनाईक यांना गंभीर जखमी स्थितीत बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यासंदर्भात म्हार्दोळ पोलिसांनी हिरो होंडा स्प्लेंडर चालक विश्वजित गावडे याच्याविरुद्ध निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १०६(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत आहे. 

हेही वाचा