मध्य प्रदेश येथील पर्यटकांचे लॅपटॉप

पैंगीण : देवबाग, काणकोण (Canacona) येथील एका गेस्ट हाऊसमधून (Guest House) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) तीन पर्यटकांचे (Tourist) तीन लॅपटॉप (Laptop) चोरीला गेले. देवाबाग येथील येथील ‘मिकासा बाय द मेडोज गेस्ट हाऊस’मध्ये कुलुप नसलेल्या खोलीतून अज्ञातांनी हे लॅपटॉप चोरले. चोरण्यात आलेले तीनही लॅपटॉप वेगवेगळ्या कंपन्यांचे होते.
काणकोण पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ते १ जानेवारीच्या पहाटे दरम्यान हे चोरीचे प्रकरण घडले. मध्य प्रदेशेतील बालाघाट येथील रहिवासी तुषार तुरकर यांनी काणकोण पोलीसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा अॅपल प्रो १३ लॅपटॉप, आदर्श आनंद व मोहित जिंदाल यांचे अनुक्रमे अॅपल एअर १३ आणि लेनोवो थिंकपॅड ई १४ जी५ हे लॅपटॉप चोरीला गेले आहेत. यासंदर्भात काणकोण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४), ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित वेळीप अधिक तपास करीत आहेत.