तुये हॉस्पिटलासाठी ११ पासून करणार उपोषण

तोंड उघडण्यासाठी आता नाक दाबण्याची वेळ

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
09th January, 04:11 pm
तुये हॉस्पिटलासाठी ११ पासून करणार उपोषण

पणजी : सरकारचे (Government) तोंड उघडण्यासाठी नाक दाबण्याची वेळ आली आहे. तुये हॉस्पिटल (Tuem Hospital) लवकरात लवकर सुरू झाले नाही तर ११ जानेवारीपासून उपोषण (Hunger Strike) करणार; असा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीचे (Tuem Hospital Kruti Samiti) नेते देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिला आहे.

तुये हॉस्प‌िटल लवकर सुरू करण्यासाठी समितीने पणजीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. पेडणे तालुक्यात आवश्यक त्या प्रमाणात आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे तुये हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. ११ ते १५ जानेवारी पर्यंत तुये हॉस्पिटलाजवळ आम्ही उपोषण करणार. त्यानंतर १५ जानेवारीला संध्याकाळी तुये आयटीआय ते हॉस्पिटलपर्यंत मशाल मिरवणूक काढणार. मिरवणुकीनंतर जाहीर सभा होणार; असे देवेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदार सरकार पक्षाचे आहेत. तरी सुद्धा तुये हॉस्पिटल सुरू होत नाही. त्यामुळे आजारी असलेल्यांना म्हापसा किंवा गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलात दाखल करावे लागते. गोमेकॉवरील ताणही त्यामुळे वाढत आहे. तुये हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू झाले तर पेडणेकरांची सोय होऊन गोमेकॉ वरील ताण काही प्रमाणात कमी होणार; असे यावेळी लोकांनी सांगितले. 

हेही वाचा