बुलबुल बाल चित्रपट महोत्सवाची तयारी पूर्णत्वास

उद्या सायंकाळी उद्घाटन समारंभ : नागराज मंजुळेंची उपस्थिती

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
25 mins ago
बुलबुल बाल चित्रपट महोत्सवाची तयारी पूर्णत्वास

मडगाव : बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Bulbul Childrens International Film Festival) मडगाव येथील रवींद्र भवनात (Margao Ravindra Bhavan) १३ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ एप्रिल मे ९९ चित्रपटाने होणार असून; दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित असतील. महोत्सवाची तयारी पूर्णत्वास आलेली असल्याची माहिती संयोजक बिपीन खेडेकर यांनी दिली.

 मडगाव रवींद्र भवनात होणार्‍या तिसर्‍या बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी पूर्ण होत आल्याचे महोत्सव दिग्दर्शक बिपीन खेडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, महोत्सवात देशातील व परदेशातील चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे.  मापुसकर यांच्या एप्रिल मे ९९ या चित्रपटाने होणार आहे. गोव्यातील मुलांच्या कलांसह कोलकाता येथून आलेल्या मुलांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. शाळांच्या मुलांसाठी विविध स्पर्धा होत असून; मुलांकडून सराव केला जात आहे. आंतरराष्ट्रीय परीक्षक गोव्यात दाखल झालेले आहेत. या महोत्सवात मुलांसाठी पोषक आहार कोणता व कसा करायचा यावर पालकांसाठी प्रशिक्षण असेल. चित्रपटातून मुलांवर संस्कार होतील, त्यांच्या संकल्पनांना वाव देण्याचा प्रयत्न असेल. मोबाईलचे परिणाम यावर सायबर तज्ज्ञ रक्षित टंडन मार्गदर्शन करतील. केवळ चित्रपटातून मनोरंजन नाही तर मुलांना भविष्यासाठी तयार करणारा हा महोत्सव असेल. मुलांची कल्पनाशक्ती वाढेल अशा गोष्टी मिळतील असे स्टॉल्स असतील. पालकांसाठी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. पालकांनी मुलांसह या चित्रपट महोत्सवात येत आस्वाद घ्यावा, असे आवाहनही केले.

हेही वाचा